सोलापूर : सोलापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर मेन पाईप लाईनला कोळेगांव, लांबोटी, शिराळपाटा लकी हॉटेल जवळ, लांबोटी सुनिल हॉटेलच्या पाठीमागे दोन ठिकाणी, सिनानदी पात्रात वॉशऑऊट व्हॉल्व काढणे व चिखले बसस्टॉप इत्यादी ठिकाणाचे कामे तसेच उजनी येथील जुने स्विचयार्ड मधील एमएसईडीसीएलचे कनेक्शन शिफ्ट करण्यासाठी ३३ केव्ही लाईनखाली पोल उभा करणे, नव्याने बसविण्यात आलेल्या एनर्जी मिटर जोडणे आदी कामे पूर्ण करण्यासाठी ४ जानेवारी २०२४ रोजी ८ ते १० तासाचा शटडाऊन घेणार असल्याने उजनी येथून पाण्याचा उपसा पुरेशा प्रमाणात होणार नाही अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
उजनी हेड वर्क्स या ठिकाणाहून शटडाऊन कालावधीत पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होणार नसल्याने सोलापूर शहराचा उजनी वरील तसेच भवानी पेठ कस्तुरबा, दयानंद हायलेव्हल, पर्सिवल येथील पाणी पुरवठा ४ जानेवारी २०२४ पासून १ दिवस १ रोटेशन पुढे जाईल याची सोलापूरकरांनी नोंद घ्यावी. नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेने केले आहे.