येस न्युज मराठी नेटवर्क : जेल रोड पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने केलेल्या कारवाईत मार्केट यार्ड परिसरात कापडी पिशवीतून मोबाईल विकणाऱ्या सिताराम कांबळे याला ताब्यात घेण्यात आले . त्याच्याकडील १,२४,५०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यापैकी दोन मोबाईल जेलरोड पोलिस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या दोन गुन्ह्यामधील असल्याचे स्पष्ट झाले आहे . २ मे रोजी एक व्यक्ती सिद्धेश्वर मार्केट यार्ड च्या पाठीमागे मोबाईल विकत असल्याची खबर मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.