सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा पदभार पुन्हा सुलभा वटारे यांच्याकडे देण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची बदली झाली आहे. त्यामुळे या पदावर वटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर येथे यांची राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद शिक्षणाधिकारी म्हणून विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. मंगळवार (७ फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव टि. वा करपते माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या बदलीचे आदेश काढले होते.
माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार योजना विभागाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.