येस न्युज मराठी : न्यूझीलंडच्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरु असून या सामन्यात सूर्यकुमार यादव नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या 49 चेंडूत शतक ठोकणाऱ्या सूर्याने सामन्यात केलेल्या नाबाद 111 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याशिवाय अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतल्याचं पाहायला मिळालं.