आज दिनांक 20/08/2025 रोजी जि.प. प्राथमिक शाळा ,अनगर येथे सर रोनाल्ड रॉस यांच्या जन्म दिनानिमित्त माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले साहेब , मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर अवधूतराव मॅडम, मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुण पाथरूडकर साहेब ,तालुका हिवताप पर्यवेक्षक शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व वैद्यकिय अधिकारी डॉ. तकदीर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली (world mosquitoes day) “जागतिक डास दिन ” साजरा करण्यात आला यावेळेस जि.प. प्राथमिक शाळा अनगर येथे आरोग्य सेवक कांबळे आर. बी. व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राहुल मासाळ साहेब यांची तर्फे आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच डास निर्मुलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली व नागरिकांमध्ये डासांचा प्रतिबंध करणे बाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, गावातील नागरिक व प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर येथील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,आशा कार्यकर्ती इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.