सोलापूर : तेलुगु भाषा दिवस व तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने 23 व्या वर्धापन दिनानिमित्त आज श्रीकृष्ण देवस्थान सभागृह न्यू पाछा पेठ येथे पार पडला. तेलगु माध्यमातून दहावीत चांगल्या टक्क्याने पास झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचे संस्थेच्यावतीने पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गरीब होतकरू विद्यार्थिनीला संस्थेच्या वतीने एक लॅपटॉप आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी खासदार धर्मणा सादुल, सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी संतोष जाधव, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश अण्णा कोठे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मल्लिकार्जुन कमटम, बाळराज बोल्ली, पेंटप्पा गड्डम आदी मान्यवर उपस्थित होते.