सोलापूर ; राजेश कोठे नगर लक्ष्मी पेठ येथील संत मुक्ताई मंदिरात २७ मेपासून दोन जूनपर्यंत श्रीसंत मुक्ताई संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे पाचला काकडा आरती, सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी साडेपाचला हरिपाठ, सायंकाळी सातला हरि कीर्तन आहे. व्यासपीठ प्रमुख म्हणून ह.भ.प.गोविंद महाराज माने हे काम पाहतील.निळोबा महाराज जांभळे, भानुदास महाराज बचुटे यांच्या उपस्थितीत काला प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम नियोजनासाठी अध्यक्ष शंकर भोसले, किशोर धायगुडे, प्रभाकर ताटे व सदस्य नियोजन करीत आहेत.
हरी कीर्तन करणाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे : २७ रोजी ह.भ.प.तानाजी महाराज बेलेराव, दि. २८ ह.भ.प.भानुदास महाराज बचुटे, दि. २९ ह.भ.प.आदर्श इंगळे महाराज, दि. ३० ह.भ.प.रामहरी महाराज शेंडगे, दि. ३१ रोजी ह.भ.प.मन्मथ महाराज उळेकर, १ जून रोजी गुलालाचे कीर्तन ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांचे होईल. तर २ रोजी ह.भ.प.अनंत (बापू) महाराज इंगळे (सकाळी दहा ते बारा – काला कीर्तन) आहे.