नाताळ व नववर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने सोलापूरातील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर मध्ये पुलसाईड दि ग्रिल येथे केक मिक्सींग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
णाताळ व नववर्षाकरीता अश्या प्रकारचा उपकम मोठ्या शहरात केला जातो सोलापूरात मागिल दोन वर्षापासून केक मिक्सींग चे आयोजन केले जाते. या मिक्सींग वेळी केक मध्ये आमंत्रिताव्दारे विविध प्रकारचे ड्रायफुटस रेझीन्स आदी केक संबधी सामग्रीचे मिक्सींग केले जाते नंतर हा केक तयार करण्याकरीता ठेवण्यात येतो. या केक पर फ्लेवर्ड ड्रायफुटस व डेकोरेशनव्दारा सजवले जाईल आणि नंतर तो नाताळ निमित्त खाण्यास उपलब्ध होणार असल्याची माहिती शेफ महेश जाधव यांनी दिली. यंदाच्या वर्षी केक मिक्सींग या कार्यकमाची सुरवात वंदना रेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यकमास अनुराधा चांडक, शारदा भैय्या, स्वरूपा रेडडी, गीता बाकळे, नविता मुर्ती, श्रीया दुधनकर कमल शहा, पुजा मुटगिरी, रजनी मुटगिरी, प्रती मुटगिरी, शहरातील प्रतिष्ठीत महिला वर्ग उपस्थित होते. प्लम केक फलम फुडीग विविध प्रकारचे केक नाताळ करीता बनविले जातात. नाताळ निमित्त व नववर्षा निमित्त बालाजी सरोवर प्रिमिअर येथे खिसमस ट्री व जिंजर हाऊस तसेच हॉटेल मधिल कोर्टयार्ड लॉबी मध्ये आर्कषक लायटिंग करण्यात आलेले आहे. हा कार्यकमास बालाजी सरोवर मधिल अंबुजकुमार सिंह, नितिन गायकवाड, गीता हासनी ,प्रिती हसवानी ,निलगंगा शिंदे, लक्ष्मी नारायण, मॅनेजर ब्रिजेश सिंह उपस्थित होते.