सोलापूर – समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अद्वितीय गुरु आणि शिष्यांची जोडी आहे. ।। एप्रिल समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या दोन्ही महामानवांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनासाठी ऐतिहासिक लढा दिलेला आहे. त्यांनी केलेल्या रक्तविहीन सामाजिक क्रांतीमुळे शोषित, वंचितांना न्याय मिळाला. सन्मानाचे जीवन मिळाले. म्हणूनच या महामानवांचा जन्मदिवस आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आहे. त्यांचे विचार आणि कार्य शोषित वंचितांच्या जगण्याची दिशा आणि ऊर्जा आहेत. जयंतीच्या निमित्ताने आमच्या बोधीवृक्ष फाउंडेशनच्या वतीने विविध विधायक उपक्रम घेवून या माध्यमातून आम्ही अभिवादन करत आहोत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये 1891+109=2000 वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
वारांगनांच्या इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेतलेल्या छत्तीस मुलांना शैक्षणिक साधनांचे वाटप
या कार्यक्रम जिल्हा परिषद अभियंता मा. राजेश जगताप आणि संभव फाउंडेशन चे अध्यक्ष मा. आतिश कविता लक्ष्मण यांच्या प्रमुख उपस्थिती..