बाळीवेस उत्तर कसबा येथील शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपतीला रविवारी देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली. भक्तांनी देवाच्या चरणी आंबे प्रसाद म्हणून आणून दिले आहेत, त्याचीच आरास रविवारी करण्यात आली.
गणपती मूर्ती भोवती आंबे रचून सजावट केली त्यासमोर बैलगाडी शेतकरी परिवार यातून आंबे वाहतूक करण्यात आले असा देखावा करण्यात आले. तर कसबा परिसरातील बहुतांश परिवार हे शेती व्यवसाय करतो. अथवा त्याची शेती असून करुहुनी सणाला श्रीमंत मानाचा कसबा गणपती शेतकरी संघटना यांच्या वतीने सामूहिक बैल जोडीची मिरवणूक काढण्यात येते हे अनेक वर्षापासून परंपरा आहे.
आमरस प्रसाद वाटप.
जे भाविक देवाचरणी आंबे दिले आहेत त्यांना 29 एप्रिल रोजी प्रसाद म्हणून आंब्याची शेष दिले जातील. पूजेसाठी जे आंबे आले आहेत ते एकत्रित करून आमरस चपाती भात भाजी असे महाप्रसाद तयार करून शासकीय रुग्णालय व अनाथ आश्रम येथील नागरिकांना व अनाथ मुलांना देणार साधारण 1000 भाविकांना वाटप करण्यात येईल. यासाठी फूड बँक ची मदत घेण्यात येईल.अशी माहिती उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांनी दिली
यावेळी आंब्याची आरास करण्यासाठी संदीप जोशी गिरीराज भोगडे नागनाथ मेंगाणे शिवराज कडगची जीवन जोशी गिरीराज निगंदळी रवी भोगडे शशांक खुने संजय बिराजदार आदी नी परिश्रम घेतले
यावेळी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ भोगडे.उपाध्यक्ष प्रकाश वाले. खजिनदार केदार मेंगाणे सचिव मल्लिनाथ खुने. शिवानंद कोळकूर.आदी ट्रस्टी चे सहभाग लाभला