• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्राविका शिक्षण संकुलात शाळेच्या प्रथम दिवशी विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करुन फुलांच्या पायघड्या घालून गोड खाऊ वाटपाने विद्यार्थ्यांचे स्वागत

by Yes News Marathi
June 17, 2025
in इतर घडामोडी
0
श्राविका शिक्षण संकुलात शाळेच्या प्रथम दिवशी विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करुन फुलांच्या पायघड्या घालून गोड खाऊ वाटपाने विद्यार्थ्यांचे स्वागत
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक शाळा, उमाबाई श्राविका माध्यमिक शाळा तसेच पी एस इंग्लिश मीडियम प्री प्राइमरी व प्रायमरी विभागात नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली. शाळेचा सर्व परिसर फुगे, फुलांच्या माळा ,रांगोळीने सजवण्यात आला.शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांच्या पायघड्या घालून शालेय गीताच्या तालावर त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले .

त्यानंतर संस्थेचे विश्वस्त तसेच सेक्रेटरी श्रीमान यतीन शहा हे सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी शुभेच्छा देण्याप्रसंगी संस्थेत उपस्थित होते. श्राविका शिक्षण संकुलातील नवीन गणवेशासह उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यासोबत श्रीमान यतीन सरांनी ग्रुप फोटो घेतला.


त्यावेळेस श्रीमान यतीन सरांनी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे महत्त्व त्याची ओळख व समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन याबाबत सविस्तर माहिती दिली. ते बोलताना त्यांच्या प्रिसिजन समूहातील अनेक गोष्टींची उदाहरणे देऊन श्राविका शिक्षण समूहातील शिक्षकांचे मनोबल वाढवण्यास प्रवृत्त केले.

श्राविका शिक्षण संस्थेच्या या पुढील प्रवासाचे, थोडक्यात वर्णन श्रीमान यतीन सरांनी सर्व कर्मचाऱ्यांंसमोर मांडले व येत्या पुढील पाच वर्षात श्राविका संस्था ही सोलापुरातील नंबर वन अग्रेसर शैक्षणिक संस्था बनवण्याकरिता नवीन बदलासह स्वप्न सर्वांनी उराशी बाळगावे अशी आशा व्यक्त केली.
शिक्षकांच्या सहकार्यातूनच संस्थेचा व विद्यार्थ्यांचा विकास होणार आहे म्हणून शिक्षकाने अद्ययावत ज्ञान ग्रहण करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रथम शैक्षणिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्राविका संस्थेच्या सीईओ देवई शहा मॅडम,प्रिसिजन समूहाचे समन्वयक श्री माधव देशपांडे सर तसेच श्राविका शिक्षण समूहातील विविध विभागांचे सर्व प्राचार्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

2025-26 अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल बिया गोदाम बांधकामाकरीता अर्ज करण्याचे आवाहन…

Next Post

सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी

Next Post
सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी

सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group