शंकर चौगुले यांनी संघर्ष करीत कर्तुत्वाच्या जोरावरच नेतृत्वाचा आरंभ केला:-माजी महापौर महेश कोठे
सोलापूर :- मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन, तथा बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांच्या वाढदिनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, बांधकाम, अशा अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या दरम्यान कामगार नेते तथा माजी आमदार काँग्रेड नरसय्या आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, जिल्हा मजूर सहकारी संस्था संचालक मंडळ, सोलापूर जिल्हा वडार समाज खान कामगार समाजसेवा मंडळ, वडार न्याती संस्था, वडार समाज युवक संघटना, मी वडार महाराष्ट्राचा सोलापूर, आय.जी. ग्रुप, पार्क ग्रुप, एस.पी. ग्रुप पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट, माझे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर मित्रपरिवार, स्टार लेझीम संघ अशोक चौक, श्री विष्णू तरुण मंडळ वडार समाज मड्डी वस्ती, कासेगाव चे सरपंच यशवंत वाडकर,श्री आद्य जगद्गुरु देवरदासमय्या हटगार कोष्टी समाज सामाजिक संस्था अशा अन्य विविध संस्थेच्या वतीनं शंकर चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांनी शंकर चौगुले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिनी सत्कार करून त्यांच्या पुढील राजकीय सामाजिक क्षेत्रासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या आजोळ कर्तुत्वाने राजकीय सामाजिक बांधकाम शैक्षणिक अशा अन्य क्षेत्रात स्वतःची मुद्रा शंकर चौगुले यांनी उमटविले आहे त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचे आपल्या मनोगतात आडम मास्तर यावेळी म्हणाले. तसेच मड्डी वस्ती येथील 51 फुटी हनुमान गड येथे माजी महापौर महेश कोठे यांनी देखील शंकर चौगुले यांच्या वाढदिनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शंकर चौगुले यांनी आपल्या जीवनामध्ये संघर्ष करीत कर्तुत्वाच्या जोरावर नेतृत्वाचा आरंभ त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक बांधकाम व्यवसाय जिल्हा मजूर संस्था अशा अन्य क्षेत्रात एक कुशल संघटक म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे कर्तृत्व,दातृत्व, नेतृत्व असे त्याचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पुढील कार्यास आमच्या सदैव शुभेच्छा असणार असल्याचे यावेळी महेश कोठे म्हणाले. शंकर चौगुले यांच्या वाढदिनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं तसेच अन्य विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.