राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत उद्या मंत्रालयात काढली जाणार आहे. आपल्याच गटाला आणि आपल्याच पक्षाला महापौर पद मिळावे यासाठी मुंबई पासून सोलापूर पर्यंत महापौर पदाची खुर्ची पटकाविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आज मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. युती आणि आघाड्याचे गणित अवघड बनले आहे. या माध्यमातून माजी आमदार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच नेत्यांच्या मुलांना आता मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन लॉन्चिंग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या निमित्ताने पाहता येणार आहे. 68 गटांमध्ये विविध ठिकाणी स्थानिक आघाड्या देखील होऊ लागले आहेत. नगरपालिका निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही मात्र सोलापूर महापालिकेत दणदणीत यश मिळाले त्यामुळे आता ग्रामीण भाग भाजप ताब्यात घेण्यासाठी ताकतीने लढत आहे. त्याला किती यश मिळते हे 7 फेब्रुवारी रोजीच कळणार आहे.

