सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 500 सेवानिवृत्त शिक्षक सहभाग घेणार
सोलापूर– जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे पेन्शन अंशराशीकरण व उपदान रक्कम मिळावेत म्हणून महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने 2 ऑक्टोबर म.गांधी जंयती दिनी शिक्षक संचालक व शिक्षण आयुक्त पुणे कार्यालयासमोर एक दिवसाचा धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्रक अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिध्दीस दिली आहे. शासकीय कर्मचारी,खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्याना सेवानिवृत्तीनंतर लगेच पंधरा दिवसात सर्व रकमा दिला जातो मात्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाना गेल्या दोन वर्षापासून या रकमे पासून वंचीत ठेवले आहेत.यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरीत हे धरणे आंदोलन आहे.
सेवानिवृत्ताना मागील महागाई फरक नाही, सातव्या वेतनाचे हप्ते थकवून ठेवले आहेत प्रत्येक जिल्ह्याला अपूरे निधी तरतूद करून मोजक्याच सेवानिवृत्ताना रकमा देत आहेत सेवानिवृत्ती तारखे पासून थकलेल्या 30/35 लाखाला शासन व्याज देणार आहे का? कोरोणा ड्यूटी करता करता मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसाना एकालाही 50 लाखाच्या विमा मंजूर केले नाही अनुकंपा नोकरी नाही या सर्व मागण्यांसाठी सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा हा एल्गार आहे राज्यातील 2000 सेवानिवृत्त शिक्षक सहभागी होणार आहेत. हे सांगताना या वेळी सरचिटणीस मल्लीकार्जून बडदाळ कार्याध्यक्ष सुभाष फूलारी नेते रमेश गायकवाड तालुका अध्यक्ष रामचंद्र निकबे बसवणप्पा जिरगे बादशाहा मुल्ला रामचंद्र कचरे राजेद्र केदार आदी उपस्थित होते.