सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इंद्रभवन येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिकेचे आयुक्त यांच्या सह सर्वानी संविधानाचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. यावेळी अति. आयुक्त विजय खोराटे, संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, मच्छिंद्र घोलप, मुख्य लेखापाल कोळी मॅडम, सहा. आयुक्त पुष्पागंधा भगत, विक्रम पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, कामगार कल्याण योजना संपर्क अधिकारी कस्तुराबाई चौगुले, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी, युवराज गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.