सोलापूर हुतात्मा नगरीत छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी गौरवास्पद कार्यक्रम केले जात असुन त्याकामी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तथा आमचे हितचिंतकांचे सहकार्य मिळत असुन आम्ही त्यांचे मनापासुन आभार प्रकट करतो. सालाबादप्रमाणे ” जेथे घर तेथे छत्रपती शिवाजी महाराजाची मुर्ति “अशी उक्ती साकार करण्याचा आमचा मानस असुंन आगामी दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असुन त्याकामी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण आंबा भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सदर पत्रकार परीषद घेतली जात आहे.
गेल्या वर्षी साधारणपणे 1500 मुर्ति वाटपांचा उपक्रम यशस्वी झाला होता शिवाय विविध सामाजिक कामें करण्यात आली होती. प्रतिष्ठानच्या उपक्रमाबाबत शहर व ग्रामिण भागातुनही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता आणि मिळत आहे.
सर्व धर्म समभाव तथा राष्ट्रीय एकात्मता सदरांखाली कार्य करीत असुन प्रतिष्ठानचे पदाधिकारीसुध्दा मौलीक सहकार्य करीत आहेत. यावर्षीसुध्दा प्रतिष्ठानवतीने जास्तीत जास्त मुर्ती वाटप करण्याचे योजीले आहोत. त्याशिवाय येत्या पंधरवडयात घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती वाटप करण्याचा चंग बांधले आहे. तसेच गोरगरीबांना खाऊ वाटप करणे, मोफत डोळे तपासणी व चष्में वाटप शिबीर घेण्याचे निश्चित केले आहोत. सोलापूर ते तुळजापुर मार्गावर एकरुखजवळ घाटाजवळ कमान नामकरण ‘गेटवर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दार नामकरण करण्याचे योजिले असुन त्याकामी कार्यवाही चालु असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण आबां भोसले यांनी दिली.