सावळेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दत्तनगर व यशवंतनगर या परिसराचे सांडपाणी अंगणवाडी क.०६ बायपास येथिल नाल्याव्दारे गावालगत बाहेर जाते हया भागात सिमेंटचा रस्ता व भुमिगत पाईपलाईन चे काम करून मिळावे अशी मागणी बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या संचालक मंडळाकडे केली होती. बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्यावतीने सावळेश्वर गावातील अंर्तगत सिमेंटकॉकिटचा रस्ता व भूमिगत सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्याकरीता पाईपलाईनच्या कामास मंजूरी देण्यात आली या कामाचा शुभारंभ तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार यांचे हस्ते श्रीफळ वाढऊन करण्यात आला.
बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्यावतीने सावळेश्वर गावातील वडरगल्ली एमडीआर ३५ पासून ब्रम्हनाथ मंदिर पयंत २५० मिटर सिमेंट कॉन्कीट रस्ता व ८०० एम एम पाईप चे २५० मिटर भूमिगत पाईपलाईन व ३०० एम एम पाईपलाईन चे काम पावसाचे पाणी जाण्याकरीता (सेव्हेज वॉटर) करण्यात येणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले. कालिदास गावडे यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्स चे संचालक व राजेश्वर रेड्डी तसेच राम रेडडी सरांचे सावळेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने आभार मनले.
या प्रसंगी सावळेश्वर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रभाकर गावडे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे, सुरेश गावडे, सुधीर गावडे , दादा लांडगे, ग्रामपंचायत सदस्य दादा लांडगे, सखाराम शिंदे, आनंद गावडे, सिताराम गुंड, जगु पुजारी, बसवराज अंटद बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे दत्तप्रसाद सांजेकर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .