मोहोळ तालुक्यतील शिरापुर गावात हिंन्दु स्मशानभुमी मध्ये एक दहनशेड आहे ते खराब झाले आहे. शिरापूर ग्रामपंचायतीचे ने बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक यांचे कडे स्मशानभुमी मधिल कामे करून मिळावे अशी मागणी केली, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळानी शिरापूर गावातील हिन्दू स्मशानभूमी सुशोभीकरण करून या मध्ये दहनशेड बांधकाम (आर सी सी नविन शेड बांधकाम, बिडची शवदाहिनी बसवणे. पेव्हर ब्लॉक, पाण्याची टाकी विविध कामे स्मशानभुमी मध्ये स्वच्छतागृह व स्नानगृहाचे बांधकाम व नागरीकांना बसण्यासाठी गार्डन बेंच या विविध कामास तात्काळ मंजुरी दिली.
बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत हिंन्दु स्मशानभुमी येथिल कामाचे भुमीपुजन आज जेष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांचे हस्ते नारळ वाढऊन करण्यात आले या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, अमोल कारंडे पत्रकार महेश पांढरे, शिरापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका आम्रपााली भालशंकर, ग्रामपंचायत सरपंच वृषाली सावंत, उपसरपंच सौदागर साठे, ग्रामपंचायत सदस्य विजया ताकमोगे, रेणुका बंडगर, सागर काळे, अप्पासाहेब कोळेकर, फंटु कोळेकर, बाळासाहेब धोत्रे, इंजिनिअर चंद्रकांत पुजारी, हरिदास थिटे , विश्वनाथ सावंत, गजानन कुंभार, बसवराज, बसवराज अंटद, राहुल सर्वगौड, तसेच व गावातील नागरीक उपस्थित होते.
शिरापूर ग्रामस्थांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार मानले.
शिरापूर ग्रामस्थांनी नविन स्मशानभुमी सुशोभीकरण व नविन शेड तसेच स्वच्छतागृहाचे बांधकाम अश्या विविध कामास बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएस आर अंर्तगत मंजुरी दिली व तातडीने सुरवात केली या बददल ग्रामस्थांनी व सदस्यांनी आभार मानले.