दक्षिण सोलापूर कासेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने बालाजी अमाई न्सच्या व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचेकडे कासेगावामध्ये सध्या पाणी टंचाई होत आहे त्या करीता बोअर व टॅन्कर ची मदत मिळावी अशी मागणी केली होती. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सरपंच श्री यशपाल वाडकर व गावातील ग्रामपंचायत सदस्य यांचे सोबत चर्चा करून पाणी टंचाई करीता तात्काळ काय उपाय करता येईल व कासेगाव चा पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्याचे ठरवीले .
कासेगावास पाणी पुरवठा करणा-या सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरी चे खोलीकरण करण्याचे ठरविले .बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळानी कासेगाव पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाच्या कामास मंजुरी दिली. सध्या असलेल्या विहिरीस अणखीन खोलीकरण व गाळकाढुन खोली वाढवल्यास पाणी कमी पडणार नाही त्या मुळे खोलीकरण करण्याचे काम क्रेनमशीनव्दारे करण्याचे नियोजन केले.
कासेगाव ग्रामपंचायतीच्या सर्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ आज बालाजी अमाईन्स चे सी.एस.आर. प्रमुख श्री मल्लिनाथ बिराजदार यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे खोलीकरणाच्या कामास तात्काळ मंजुरी दिली व त्वरीत सुरवात केली या खोलीकरणाच्या कामामुळे कासेगाव च्या पाणी पुरवठयाचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार असून हयाकामास बालाजी अमाईन्सने मदत केली याबददल व्यवस्थापकीय संचालक राम रेडडीसर व संचालक मंडळाचे आभार मानले या कार्यक्रमास उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, सदस्य संभाजी चौघुले, भरत जाधव, ताजोदिदन शेख, बालाजी चौघुले, गजेन्द ननवरे, नवनाथ खोडे, ग्रामपंचायतीचे सदस्य व्ग्रामसेवक बाळासाहेब चौघुले, व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, बसवराज अंटद व ग्रामस्थ उपस्थित होते .