नवी दिल्ली : तब्बल चार वर्षांआधी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. यानुसारत आताही रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता 10 आणि 100 च्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात येणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किंवा एप्रिल 2021 पर्यंत व्यवहारातून बाद केल्या जातील असं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या जुन्या नोटांची मालिका मागे घेण्याच्या योजनेवर आरबीआय सध्या काम करत आहे. पण नोटा बाद करण्याआधी 100, 10 आणि 5 च्या नवीन नोटा बाजारात आणल्या जातील अशीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या नोटांवर बंदी नसून बाजारात नव्या नोटा आल्या की जुन्या नोटा बाद होतील.