सोलापूर : वृद्धाश्रम असणे ही आपल्या समाजाची अधोगती आहे. एकत्र कुटुंबात सुखसोयी आहेत. एकत्र कुटुंबात राहात असाल तर मुलांचे व सुनांचे, मुलींचे करिअर घडेल. सध्या लहान मुलांना मोबाईलचे वेड लावले आहे. कारण घरात आजी-आजोबाच नाहीत, आई-वडील कामात असताना मुलं करतील तर काय? संवाद कमी झाला आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबाची खूप गरज आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती वाढली तर वृद्धाश्रम नाहीसे होतील, असे प्रतिपादन अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.प्रकाश महानवर यांनी केले.
जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या पुरस्कार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जैनोस्कोचे माजी अध्यक्ष डाॅ.मधुकर लोखंडे होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हुकुमचंद हेसे, कार्याध्यक्ष बाबुराव तंगा, न्यायाधीश दीपाताई कोळपकर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रा.धन्यकुमार बिराजदार यांनी करून दिला.
जैन कासार प्रतिष्ठानच्या वतीने चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव वनकुद्रे यांना जीवनगौरव, वैराग येथील गोविंद कासार व उषाताई कासार यांना ‘आदर्श दाम्पत्य पुरस्कार’ व नीताताई नळे यांना आदर्शमाता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच नांदेड येथील ढोके कुटुंबियांना स्व.अभजित यांचे मरणोत्तर अवयवदान देऊन सहा जणांना जीवनदान दिल्याबद्दल ढोके कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रारंभी रूपाली भस्मे यांनी णमोकार मंत्र म्हटले. दीपप्रज्वलनानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष हुकुमचंद हेसे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना पुरस्कार देत असतो. तसेच विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन त्यांचाही सत्कार करीत असतो. गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. यावेळी चेंबर ऑफ काॅमर्सचे राजू राठी यांनीही वनकुद्रे यांच्या कार्याचा गौरव केला.
यशस्वी व निवड झालेल्या बांधवांचा सत्कार
यावेळी यावर्षीच्या यशस्वी समाज बांधव जैन कासार मंदिराचे नूतन अध्यक्ष विलास कंदले, महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथी परिषेचे प्रशासक डाॅ.विलास हरपाळे, सेक्रेटरी बाबुराव तंगा, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रा.धन्यकुमार बिराजदार, कांचन कंदले, कविता भस्मे, गीता मोहोळकर, मंजुषा मैंदर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक
सी.ए. झालेल्या संकेत उल्हास डोंगरे, देवराज प्रशांत कासार, एम.एसस्सी. झालेल्या अर्थव डांगरे, दर्शन लोखंडे, पी.एच.डी. झाल्याबद्दल जितेंद्र कंदले यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्ह्यामधून बारावीमध्ये प्रथम आलेल्या वैष्णवी विजयकुमार सगरशेट्टी, हर्षिता नरेंद्र खोबरे, अक्षय शांतीनाथ बागेवाडी, तसेच दहावीमधील समृद्धी अमोल कासार, आयुष अमोल काटकर, नेहा राहूल कंदले यांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रथमेश कासार तर मानपत्राचे वाचन गीता मोहोळकर यांनी केले. संजय ऊर्फ पप्पू कंदले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावीर लाळे, सचिन पाटील, महेश नळे, विक्रांत बशेट्टी, राजेश मोहोळकर, अमोल जगधने, प्रा.संजय यादगिरे, अभिनंदन तंगा, धन्यकुमार तंगा, संजय गडदे आदींनी परिश्रम घेतले.