सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळ सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. विमानतळावर अग्निशामन वाहन सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली तसेच विमानतळ परिसरात विविध पक्षी यांचे सर्वेक्षण करण्याबाबत वनविभाग महापालिका यांना सूचना देण्यात आल्या. सोलापूर विमानतळावर प्रवासी विमान वहतूक सुरू झाल्यानंतर विमान ये – जा करण्याच्या वेळेस ओला, उबेर यांची टॅक्सी सेवा सुरू व्हावी, याबाबत माहिती घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.
यावेळी यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, किरण जमदाडे, वन विभाग, हवामान विभाग, विमानतळ प्राधिकरण व अग्निशमन दलचे अधिकारी उपस्थित होते.