सोलापूर : भारतीय स्वतंत्र दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हार तिरंगा उपक्रमा संदर्भात 17 ऑगस्ट रोजी एकाच वेळेला राष्ट्रगीत गायन होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते.त्याच अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायनाचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रगीत गायन घेण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप,उपयुक्त विद्या पोळ, लातूर महापालिकेचे उपायुक्त विना पवार,सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,सहाय्यक आयुक्त विक्रम प्रशासन अधिकारी संजय जावीर, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी,कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे आदि सह सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.त्याचबरोबर या उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या संगणक विभाग, मुख्य लेखापाल विभाग, मिळकतकर विभाग, कामगार कल्याण जनसंपर्क विभाग, अतिक्रमण विभाग, नगर अभियंता विभाग,नगर रचना विभाग ,महापालिकेचे सर्व शाळेत त्याचबरोबर महापालिकेचे सर्व विभागीय कार्यालय या ठिकाणी एकाच वेळेला आज सकाळी 11 वाजता हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.