सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळक चौक येथील पुतळयास व कोन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात सहायक आयुक्त विक्रम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सभागृह नेते श्रीनिवास करली,आनंद जोशी,श्रीनिवास पुरुड,सिद्धू तिमिगार,अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते.