येस न्युज नेटवर्क : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी आणि खासकरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी आमच्यावर आरोप लावला की आमच्या जवळचे डोंगरे ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत. ते खोटं बोलत आहेत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलं आहे, असं पटोलेंनी म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, इम्पिरिकल डेटा दिला जात नाही म्हणून अडचण झाली आहे. मोहन भागवत यांनी आरक्षणाशिवाय भारत पाहिजे अशी अनेकदा घोषणा केली. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल मुख्य न्यायमुर्ती यांची भेट घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.