येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सोलापूर शहर शाखेतर्फे शासनाचे आदेश झुगारून सलून व्यवसाय सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन जमदाडे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष सिद्राम रुद्रार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , लॉकडाउनच्या काळात वर्षी वीस नाभिकांनी राज्यात आत्महत्या केल्या. ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही कुटुंबियांसह सलून दुकानांसमोर येऊन बसणार आहोत. त्याच प्रमाणे आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन कारागृहात जाण्याची आमची तयारी असल्याचेही रुद्रार यांनी स्पष्ट केले.