No Result
View All Result
उपलब्ध पाण्याचा वापर नागरीकांनी काटकसरीने करावा : आयुक्त
- सोलापूर : वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराला 20 मार्चपासून आता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली.
- मागील आठ दिवसात अवकाळी पाऊस, वारा इत्यादि कारणाने नदीतून / धरणातून कच्चे पाणी उपसा क्षमतेपेक्षा कमी होत असल्याने शहरातील नागरीकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. वादळी पावसामुळे टाकळी, उजनी, सोरेगांव, पाकळी इत्यादि पंपींग स्टेशनवरील विद्युत पुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठयात विस्कळीतपणा आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पुढील दिवसात चार दिवसाआड पाणीपुरवठा करणे आवश्यक ठरणार आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठयाबाबत दि. २० मार्च २०२३ रोजी पासून शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
- सोलापूर शहराला पुढील दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल. तरी नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.
No Result
View All Result