• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 5, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख…

by Yes News Marathi
January 18, 2025
in इतर घडामोडी
0
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख…
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे. हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी का झाली आहे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा रकाना असल्याचा बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र एकीकडे शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना बोर्डाकडून जात प्रवर्ग हॉल तिकीट वर दिला जात असल्याचं समोर आले आहे. यंदाचे वर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या हॉल तिकीटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि त्यामध्येच विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो हे स्पष्ट हॉल तिकीटवर असलेल्या रकान्यात दिसत आहे.

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट वितरित करायला सुरुवात झाली असून दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून वितरित केले जाणार आहेत. कागदपत्रावर जातीची नोंद चुकली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येईल, विद्यार्थ्यांची जातीची नोंद शाळेमध्ये योग्य झाली आहे हे कळण्यासाठी हॉल तिकीट वर जात प्रवर्ग दिला असल्याचा सांगितलं गेलंय. सामाजिक न्याय विभागाला विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देता यावा, यासाठी दरवेळी जात निहाय आकडेवारी विद्यार्थ्यांची द्यावी लागते. त्यासाठी हॉल तिकिटावर योग्य ती जात प्रवर्ग कळल्यास त्याचा उपयोग होईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलंय.

Previous Post

चिमुकल्या साक्षी कलबर्गीचे अपघाती निधन

Next Post

सोलापूर : पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा गुन्हेगार दत्तक

Next Post
सोलापूर : पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा गुन्हेगार दत्तक

सोलापूर : पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा गुन्हेगार दत्तक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group