• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, September 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

by Yes News Marathi
September 13, 2021
in इतर घडामोडी
0
किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधील अजून एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आणि शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले . तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय, यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
२७०० पानी पुरावे…
“मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे”, असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुश्रीफ यांचे पुत्र आणि पत्नीच्या नावेही घोटाळा?
“मरू भूमी कंपनीत ३ कोटी ५ लाख रक्कम दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटींचे तर पुरावे आहेत आमच्याकडे. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे शेअर्स दाखवले आहेत. शाएदा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. २०१८-१९ मध्ये मुश्रीफ परिवारावर आयकर विभागाचे सर्च झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी-धनाजी साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहेत, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

Previous Post

बिग बॉस मधून मुस्कान बाहेर…

Next Post

विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करा : युवा महासंघाची मागणी

Next Post
विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करा : युवा महासंघाची मागणी

विजय नगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने करा : युवा महासंघाची मागणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group