येस न्युज मराठी नेटवर्क : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पासून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे स्कूटर कार आणि बसेस नंतर आता सीएनजी बसवण्यात आलेले ट्रॅक्टर ही रस्त्यावर आणि शेतात फिरताना दिसणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी उद्या देशातील पहिला सीएनजी फीटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत. ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.सध्या दिल्लीमध्ये डिझेल ची किंमत प्रति लिटर 78 रुपये आहे तर सीएनजी ची किंमत 42 रुपये प्रति किलो आहे.