• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुखचा पोलिसांकडून एन्काऊंटर

by Yes News Marathi
June 15, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुखचा पोलिसांकडून एन्काऊंटर
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय अंदाजे 30, रा. गल्ली क्र. 23/ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे) हा ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार शेख याच्यावर हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ आदी पुणे शहरातील पोलिस ठाण्यांत खून, खंडणी, घरफोडी, दरोडा अशा स्वरूपाचे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCA) अंतर्गत कारवाई झाली होती, मात्र तो गेली काही दिवस फरार होता.

नातेवाईकांकडे लपून बसलेला

पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की शेख लांबोटी गावात त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसला आहे. त्यानुसार पुणे क्राईम ब्रँचने मोहोळ पोलिस ठाण्याच्या सहाय्याने शनिवारी रात्री लांबोटी येथे संयुक्त कारवाई केली.

पोलिसांवर गोळीबार, प्रत्युत्तरात ठार

शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी जसा घेराव घातला, तसे त्याने आपल्याकडील पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्वरित प्रत्युत्तरात गोळीबार केला. या चकमकीत शेख गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून शेखच्या अन्य गुन्हेगारी कृत्यांचा तपास सुरू आहे.

परिसरात खळबळ

या घटनेमुळे लांबोटी गावासह मोहोळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीवर कारवाई झाल्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous Post

वालचंद महाविद्यालयाचे २८ विद्यार्थी NEET परीक्षेत यशस्वी; अस्मिता वाघमोडे प्रथम..

Next Post

पीएम किसानचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये होणार जमा…

Next Post
पीएम किसानचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये होणार जमा…

पीएम किसानचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये होणार जमा…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group