मुंबई : कंगना रनौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाचं या चित्रपटासाठी फार कौतुक होत होतं, मात्र कंगना प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यात अपयशी ठरली. हिंदी भाषिक भागात या चित्रपटाचा परफॉर्मन्स खूपच वाईट आहे. कंगना रानौत आणि अरविंद स्वामी सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सजलेला हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. जिथं एकीकडे चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी दक्षिण भारतीय भाषेत एक कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर दुसरीकडे, उत्तर भारतातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट उत्तर भारत आणि हिंदी भाषेत एकूण 25 लाख रुपयांची कमाई करू शकला. तमिळ, तेलुगू आणि हिंदी .. या तीन भाषांचा समावेश करून कंगना रनौतच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकूण 1.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाला कमी प्रेक्षक मिळाले, यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनही खूप कमी झाले .
दिल्ली, पंजाब, गुजरात आणि दक्षिण भारत वगळता भारताच्या इतर अनेक भागांमध्ये चित्रपटाची कामगिरी निराशाजनक होती. या चित्रपटानं दक्षिण भारतात जास्त कमाई केली असती, मात्र या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद चांगला मिळाला नाही. उत्तम सामग्री आणि अप्रतिम अभिनय असूनही, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चित्रपटानं बाजी मारू शकला नाही. मात्र, अद्याप काहीही सांगता येणार नाही. असं मानलं जातंय की चित्रपट विकेंडला चांगला कलेक्शन करू शकतो.