मुंबई : मी ओबीसी असल्यानेच मला महसूल ऐवजी हे खातं मिळालं या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षातील नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचे वय पाहिले तर पुढे त्यांना मोठी संधी मिळेल, थोडी वाट पाहावी लागेल, असे थोरात म्हणाले. थोरात म्हणाले, “काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. वड्डेटीवार यांना काही तरी वेगळ बोलायचे असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवले . बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली. वड्डेटीवार यांचे वय पाहिले तर त्यांना मोठी संधी पुढच्या काळात मिळेल,थोडी वाट पाहावी लागेल.