नांदेड : गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची तसेच सोशल मीडियाची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे .बुधवारी नांदेड मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात इंदुऱीकर महाराजांनी चक्क चित्रीकरण करणारे कॅमेरे बंद करायला लावले तसेच मोबाईल वर शूटिंग करण्यास देखील त्यांनी मज्जाव केला.
निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार आहेत. कीर्तन करताना आपल्या शैलीतून ते अनेकांचा समाचार देखील घेतात. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका कार्यक्रमादरम्यान इंदुरीकर महाराजांनी देखील गौतमी पाटीलचा समाचार घेत टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते आणि आम्ही पाच हजार मागितले तर याने पैश्याचा बाजार मांडला, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला होता. इंदुरीकर महारांजाच्या या वक्तव्याला गौतमी पाटील हिला देखील स्पष्टीकरण द्यावं लागलं. दोघांना मधील हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकारानंतर इंदुरीकर महाराज आता सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येतं आहे. इतकंच नाही तर त्यांनी प्रसार माध्यम आणि सोशल मीडियाची धास्ती घेतल्याचे दिसून येतं आहे.
बुधवारी नांदेड शहरातील नवीन पावडेवाडी येथे काँग्रेस कार्यकर्ते राजेश पावडे यांच्या वतीने इंदुरीकर महारांजाचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी पी सावंत, आमदार मोहन हंबर्डे यांच्या सह काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. इंदुरीकर महाराजाचं कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कीर्तन करत असताना त्यांनी मांडलेले मत वा भूमिका याबद्दल बाहेर काही जाऊ नये म्हणून नांदेड येथील एका कार्यक्रमात त्यांनी मोबाईल आणि चित्रीकरण करणारे कॅमेरे बंद करायला लावले होते. नागरिकांना मोबाईल मध्ये शूटिंग घेण्यास देखील त्यांनी मज्जाव केला. आयोजकाने कार्यक्रमाला स्क्रीन लावल्याने नाईलाजास्तव केवळ स्क्रीनचा कॅमेरा सुरु ठेवण्यास परवानगी दिली. चित्रीकरण करणारे सर्व कॅमेरे बंद केल्यानंतरचं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज
‘तिने ३ गाणी वाजवली आणि ३ लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही ५ हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली से म्हणतात. गौतमी पाटीलवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना इंदुरीकर महाराज यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं.