सोलापूर शहरात डॉल्बीमुक्तची चळवळ प्रभावीपणे राबवली जात असून शहरात डॉल्बी आणि लेझर लाईटला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बंदीचा निर्णय घेतला आहे. मिरवणुकीमध्ये आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता सोलापूर जिल्ह्यात देखील याची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आजच आदेश काढले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे आज सायंकाळी संयुक्त बैठक घेणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तसेच प्रांत कार्यालयाकडून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असणाऱ्या डॉल्बी तसेच लेझर लाईट चा उपयोग मिरवणुकीमध्ये करू नये पारंपारिक वाद्ये वाजवून या मिरवणुका काढाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी तुम्हाला आशीर्वाद यांनी केले आहे.

