येस न्युज मराठी नेटवर्क : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भावर्यात आडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या हल्ल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेसंह अन्य एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्या निकालाल राणे यांच्यावतीनं अॅड. संग्राम देसाई यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्यासमोर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना म्याँव म्याँव करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अर्जात केला आहे.