येस न्युज मराठी नेटवर्क : कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रातील राजकारणातही दिसत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षामधील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत, महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
”कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली. आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले. म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार!” असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.
कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असं कर्नाटक सरकारच्यावतीने सांगण्यात आलेलं आहे.
कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० हजार कोटींची तरतूद पण केली!!!
आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..म्हणून पाहिजे परत एकदा..फडणवीस सरकार!!