प्रारंभी मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर , योगशिक्षिका जानवी रंगदळ ,जयश्री मानधने यांच्या हस्ते संस्थेचे आधारवड स्वर्गीय विष्णुपंत तथा तात्यासाहेब कोठे व सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

इकम फाउंडेशनच्या वतीने जानवी रंगदळ, जयश्री मानधने यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे दिले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण सिरसट यांनी केले तर आभार प्रदर्शन, मुकुंद ताकमोगे सर यांनी केले.
