• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘निमा’ देशभर 23 मार्च रोजी दीड लाख बॉटल रक्त संकलन करून विश्वविक्रम करणार

by Yes News Marathi
March 20, 2025
in इतर घडामोडी
0
‘निमा’ देशभर 23 मार्च रोजी दीड लाख बॉटल रक्त संकलन करून विश्वविक्रम करणार
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : निमा आणि निफा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मे भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू यांच्या शहीद दिनी, म्हणजेच येत्या 23 मार्च रोजी देशभरामध्ये “संवेदना 2.0” या नावाने भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. देशभरातील निमाच्या सर्व शाखांकडून रक्त संकलनाचे कार्य करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील 23 मार्च 2021 रोजी NIMA ने संवेदना 1.0 या नावाने देशव्यापी रक्तदान शिबिर घेऊन विश्वविक्रमी 99644 एवढे रक्त संकलन केले होते. ज्याची नोंद “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ,लंडन” यामध्ये करण्यात आली होती. यावर्षी विक्रमी १.५ लाख बॉटल रक्तसंकलनाचा “निमा” चा संकल्प असल्याची माहिती निमा ” संवेदना 2.0 ” चे राष्ट्रीय प्रवर्तक माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी दिली.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( NIMA)  ही मिश्र चिकित्सा पद्धतीच्या व्यावसायिकांची संघटना असून संघटनेचे ४ लाखांहून अधिक डॉक्टर सदस्य आहेत. देशभरात 1500 शाखा असलेली निमा ही  सर्वात मोठी वैद्यकीय संघटना आहे.  NIMA ही इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या प्रश्नांसोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखणे, तसेच संघटनेमार्फत प्रशासनाला आरोग्य सेवेसाठी लागणारी सर्वतोपरी मदत सदैव करत राहणे यासाठी सदैव अग्रेसर असते. "निमा" कडून आरोग्य शिबिरा सोबतच वृक्षारोपण ,पूरग्रस्तांना मदत , रक्तदान शिबिरे इत्यादी सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. 

  निमा सोलापूर शाखेकडून रविवार 23 मार्च रोजी सदर शिबिरा निमित्त बाराहून अधिक ठिकाणी रक्त संकलन केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्येही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून फक्त सोलापूर परिसरातून १००० हुन अधिक बॉटल रक्त संकलन होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  निमाचे सोलापूर शाखा अध्यक्ष डॉ.नागनाथ जिड्डीमनी, मुख्य समन्वयक डॉ. नितीन बलदवा  यांनी सांगितले. दिनांक 23 मार्च रोजी खाली दिलेल्या ठिकाणी संवेदना २ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व उत्स्फूर्त पणे रक्तदान करून राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती केली. सोलापूर शहर आणि परिसरात खालील सेंटर मध्ये "संवेदना २ " हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी सेंटर संदर्भात दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले. सदर पत्रकार परिषदेसाठी. डॉ. विनायक टेंभुर्णीकर जी ( राष्ट्रीय समन्वयक), डॉ. नितीन बलदवा,(प्रकल्प प्रमुख) डॉ. नागनाथ जिड्डिमनी,(निमा सोलापूर अध्यक्ष) डॉ.अभिजीत पुजारी (निमा सोलापूर सचिव) डॉ.प्रवीण ननवरे (खजिनदार)डॉ. रविराज गायकवाड( राज्य समन्वयक) डॉ. आयाचित आणि डॉ. उत्कर्ष वैद्य( प्रसिद्धीप्रमुख)  यांची उपस्थिती होती.
  1. स्लिम हेल्थ क्लब, खान चाचा हॉटेलच्या समोर, होटगी रोड सोलापूर. 9518960025
  2. शिवानुभव मंगल कार्यालय, पश्चिम मंगळवार पेठ , सोलापूर
    9860341078
  3. माईंड हॉस्पिटल, अवंती नगर, पुणे नाका ,सोलापूर
    संपर्क- 9923091044
  4. दमानी ब्लड बँक*- 9730038877
  5. राघवेंद्र हॉस्पिटल, विजयपूर रोड, सोलापूर 94220 66550
  6. ओम हॉस्पिटल, न्यू पाच्छापेठ, गीता नगर ,सोलापूर
    9373907373
  7. शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय,टिळक चौक , सोलापूर.
    9518759143
  8. साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, वैराग ,सोलापूर- 9067750636
  9. महादेव मंदिर, शारदा क्लिनिक बाळे , सोलापूर
    संपर्क- 9970325516
  10. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट 9850048099
  11. श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, एसटी स्टँड जवळ, अक्कलकोट*
  12. अथर्व क्लिनिक- +919518759143

Previous Post

आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे रंगपंचमीचा रंगिबेरंगी रंगात न्हाऊन निघाला संस्कार संजिवनी अनाथ आश्रम

Next Post

राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू-मंत्री दादा भुसेंची घोषणा

Next Post
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू-मंत्री दादा भुसेंची घोषणा

राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू-मंत्री दादा भुसेंची घोषणा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group