सोलापूर- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) सोलापूर शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इंटिग्रेटेड डॉक्टरांच्या या संघटनेच्या देशभरात दीड हजार पेक्षा अधिक शाखा असून सोलापूर शाखा ही अत्यंत महत्त्वाची व अग्रणी शाखा म्हणूनओळखली जाते. यावर्षीही निमा सोलापूर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड ही बिनविरोध पद्धतीने झाली असून वर्षानुवर्षांची ही परंपरा यंदाही कायम राखली गेली आहे.
शे.गो.रा.आयु. महाविद्यालय सोलापूर येथे निमा सोलापूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेच्या मागील कार्यकारिणीने गत चार वर्षात केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच निमा वूमन फोरम व निमा स्टुडन्ट फोरम यांनी ही गत चार वर्षात केलेल्या कामांची उजळणी केली. तदनंतर केंद्रीय सहसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अनील पत्की व डॉ. रमाकांत आयाचीत यांनी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय निमा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक जी टेंभुर्णीकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेची ध्येयधोरणे व कार्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शे.गो.रा. आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जावळे मॅडम, संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. अनुप दोशी, साई आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड, बारामती शासकीय आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र थिमाधिमे, एम.सी.आय.एम मेंबर डॉ. सचिन पांढरे हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर सोलापूर निमा शाखेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, वुमेन फोरमचे सर्व पदधिकारी, स्टुडन्ट फोरमचे सर्व पदधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या निमा सोलापूर शाखेचे सदस्य असलेल्या डॉ.दीपक नारायणकर, डॉ. तात्यासाहेब देशमुख, डॉ. रवींद्र धिमधिमे, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. अनुश्री मुंडेवाडी.डॉ. राजलक्ष्मी गायकवाड या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन बलदवा व डॉक्टर रमाकांत आयचीत यांनी केले तर आभार सचिव डॉ. सचिन बोंगरगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टुडन्ट फोरम चे डॉ. रूषभ मंडलेच्या, डॉ. आशिष गांधी ,डॉ. योगेश उटगिकर, डॉ.आशिष चौगुले,डॉ. अविनाश पाटील. डॉ. नम्रता, डॉ.अंजली, डॉ.जय, डॉ. राज, वास्तव , डॉ.हर्षल पाटील, डॉ. समर्थ वाले यांनी अथक परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रवीण ननवरे यांनी दिली.
निमा सोलापूर शाखेची नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष- डॉ. रविराज गायकवाड.
उपाध्यक्ष- डॉ. अजित माशाळकर.
डॉ. सूर्यकांत धाप्पाधुळे
डॉ. रतनलाल संगेवाडीकर
सचिव-डॉ.सचिन बोंगरगे
कोषध्यक्ष- डॉ. नागनाथ जिद्दिमनी.
सह कोषध्यक्ष- डॉ. भीमाशंकर सिंदगी.
सहसचिव -डॉ. किरण देशमुख.
डॉ. सुनील खट्टे.
प्रमुख कार्यवाहक- डॉ. तुळशीराम घाडगे.
सहकार्यवाहक- डॉ. सिद्धाराम बगले, डॉ.आनंद गुंडू.
एम बी एस प्रमुख- डॉ. चंद्रशेखर बिराजदार .
प्रेस अँड पब्लिसिटी -डॉ. प्रवीण ननवरे . निमा वुमन्स फोरम पदाधिकारी.
अध्यक्ष्या – डॉ. सारिका होमकर.
सचिवा – डॉ. अर्पणा इंगळे
सहसचिवा – डॉ. अश्विनी देगावकर.
कोषाध्यक्ष्या – डॉ. वैशाली आगावणे.
सहकोषध्यक्ष-डॉ. शुभदा देशपांडे.
प्रमुख कार्यवाहक- डॉ. श्रुती मराठे.
मुख्य समन्वयक -डॉ.ललिता पेठकर.
कार्यकारिणी सदस्य -डॉ. परिणीता कल्याणी,
डॉ. दिपाली गाडे, डॉ.आशा माने.