मुंबई : जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉपुलर फ्रँट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास संस्थाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईतील विक्रोळी येथे पीएफआयच्या संदर्भात छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी एनआयएच्या पथक पोहोचलं असून छापेमारी सुरु आहे.
पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेख यांच्या घरी पहाटेच्या सुमारास एनआयएचं पथक पोहोचलं आहे. मात्र, वाहिद शेख हे दरवाजा उघडत नव्हता, जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही असा पवित्रा वाहिदने घेतला होता. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होतं. त्यानंतर पाच ते सहा तासानंतर वाहिदने दरवाजा उघडला आणि एनआयएच्या पथकाला घरामध्ये घेतलं. त्यानंतर आता छापेमारी सुरु आहे.