येस न्युज मराठी नेटवर्क । मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयेकडून सुरू असून, यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयएकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांची शनिवारी सकाळपासून एनआयएकडून चौकशी सुरू होती. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप एनआयएने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळालं आहे.
सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे. शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती. त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एनआयएने दोन दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली. शनिवारी कुटुंबाला समोर ठेवत वाझे यांच्याकडे चौकशी केल्याची केली. तब्बल १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली.