येस न्युज मराठी नेटवर्क : ङाॅ बाबासाहेब आंबेडकर इन्टरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टीस हे नवे संशोधन केंद्र येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात यावे त्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने विशेष निधीची तरतूद करावी.अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,व कुलगुरू यांच्या कङे निवेदनाव्दारे केली.यासंदर्भात कुलगुरू मृणालिनी फडणवीस मॅडम यांची प्रयास संस्थेस संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी समक्ष भेट घेऊन या विषयाकङे लक्ष वेधून घेतले लवकरात लवकर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारण्याबाबत चर्चे केली.तेव्हा कुलगुरूंनी लवकरच संशोधन केंद्र उभारण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला
ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मूल्याधिष्टीत सामाजिक पुनर्रचनेची जीवन दृष्टि केंद्र स्थानी ठेऊन सामाजिक न्याय व मानवविद्या या अभ्यास क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरतील अशी ध्येय धोरण आणि विकासाची दिशा यासंदर्भात संशोधनावर लक्ष केंद्रित व्हावे.त्यादृष्टीनेच राज्यातील तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनकेंद्राशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवावेत.आंबेडकरी विचार व तत्वज्ञान या विषयात एम ए व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबरोबर “ङेव्हलपमेट स्टङीज अॅन्ड सोशल पाॅलिसी” आणि “बुद्धिस्ट स्टङीज”या विषयात सुध्दा एम ए करण्याची सुवर्ण संधी विद्यार्थीना मिळावी विविध सामाजिक शास्त्रे आणि मानविद्या आदी विषयात ही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात यावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हिरीरीने पुढाकार घेऊन या संशोधनकेंद्राची स्वतंत्र इमारत सोलापूर विद्यापीठातील नवीन प्रशासकीय इमारतीत जागा आरक्षित करून यादृष्टीने विद्यापीठाकङून नियोजन करण्यात यावे
तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या दक्षिण आशियाई केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हिजिटींग फेलो या उपक्रमामार्फत एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी संशोधन शिष्यवृत्ती असे उपक्रम राबवावेत असे निवेदन सादर केले