सोलापूर (प्रतिनिधी) :नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वडापूर, कारकल येथे निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार युवा नेते मनिष देशमुख यांच्या हस्ते करून गावाच्या विकासासाठी झटून काम करावे, असा सल्ला दिला.
कारकल, वडापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सदस्यांनी यश मिळवले. सर्व सदस्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात मनिष देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी सदस्यांचे अभिनंदन व स्वागत केले. यावेळी कारकल येथील पॅनल प्रमुख अमोगसिद्ध देशमुख, इरप्पा बिराजदार, सोमनिंग बिराजदार, राचय्या स्वामी, अमोगसिद्ध पुजारी, भिमगोंडा बिराजदार, चंद्रकांत गुड्डेवाडी, वडापूर येथील पॅनल प्रमुख बिपीन पाटील, मंगेश वाघचवरे, रुबाब सय्यद, मोहन चव्हाण, दयानंद कांबळे, नागा कांबळे, संजय परसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.