सोलापूर : सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शितल तेली उगले यांच्याकडून आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्याकडे माझा भर राहील. तसेच मार्च अखेर पर्यंत उजनी ते सोलापूर जलवाहिनी पूर्ण करण्याकडे मी लक्ष केंद्रित करेल असे त्यांनी सांगितले. नवे आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

