पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेचा निकाल 97 टक्के लागला आहे. प्रशालेतील 253 विद्यार्थ्यातील 245 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी संख्या 51 इतकी आहे. विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थी 133आहेत. प्रशालेतील संस्कृत विषयात 100 गुण प्राप्त 06 विद्यार्थी आहेत.
प्रशालेचा विद्यार्थी रचित अभिजित खुपसंगीकर 97.60% प्रथम, तनिष्का नवनाथ माने 97.40 द्वितीय, अनुष्का अविनाश मोहळे 97.40 द्वितीय, मुग्धा श्रीनिवास कुलकर्णी 96.80 टक्के तृतीय
क्रमांकानी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना मालक कवठेकर, सचिव एस. आर. पटवर्धन सर, सु.त्रिं. अभ्यंकर, चेअरमन विनाताई जोशी, पदाधिकारी वा.गो.भाळवणकर सर, एस. पी. कुलकर्णी सर, डॉ. अनिल जोशी सर, डॉ. मिलिंद जोशी सर, ऋषिकेश उत्पात, संजय कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक आर.जी.केसकर, पर्यवेक्षक एम.आर.मुंढे सर, ज्येष्ठ शिक्षक आर.एस.कुलकर्णी सर, जी.एस.पवार सर शिक्षक व शिक्षकेतर यांनी केले.