येस न्युज नेटवर्क : भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आता भालाफेकच्या क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनला आहे. सोमवारी (22 मे) त्याने ही कामगिरी केली. दरम्यान, जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे.
दिग्गजांना पछाडत नीरज टॉप-5 मध्ये
जागतिक अॅथलेटिक्सच्या ताज्या क्रमवारीनुसार, नीरज चोप्राचे सध्या 1455 गुण आहेत, जे सध्याच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सपेक्षा 22 गुणांनी अधिक आहेत. भालफेकच्या जागतिक क्रमवारीत नीरजनं ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकलं असून अँडरसनचे सध्या 1433 गुण आहेत. टॉप-5 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीमही आहे.