• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, April 13, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निमा म्हणजे नवरत्नाचा खजिना – डॉ.सुहासिनी शहा

by Yes News Marathi
April 13, 2026
in इतर घडामोडी
0
निमा म्हणजे नवरत्नाचा खजिना – डॉ.सुहासिनी शहा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 निमा संघटनेच्या माध्यमातून सोलापुरात डॉक्टरांच्या विविध समस्या सोडवण्यासोबत त्यांच्यातील नेतृत्व व कलागुणाला वाव मिळून एक समाजाभिमुख व परिपक्व व्यक्तिमत्व तयार होते. त्यामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रातही अतुलनीय व भरीव कामगिरी निमाच्या माध्यमातून झालेली दिसून येते. निमा कडून आयोजित करण्यात येणारे उपक्रम नेहमीच लोकोपयोगी व स्तुत्य असून त्यामुळे सोलापूरचा नावलौकिक वाढला आहे असे मत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी निमा सोलापूर आयोजित डॉक्टरांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये व्यक्त केले.

 रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी डॉ .निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या निमा संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये व संघटनेमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या डॉक्टरांचा निमा तर्फे विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी निमा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील डॉक्टरांसोबत विविध सामाजिक संस्था व व्यक्तींनी रक्तदान केले.

वैद्यकीय क्षेत्रात अविरत व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या डॉक्टरांना निमाचा मानाचा धन्वंतरी पुरस्कार दिला जातो. यावर्षी धन्वंतरी पुरस्कार सोलापुरातील बालरोग तज्ञ व मार्कंडेय हॉस्पिटलच्या संचालक डॉ. विजयकुमार आरकाल. (ऍलोपॅथी )  व वैद्य राघवेंद्र नादरगी,(आयुर्वेद ) यां दोघांना प्रदान करण्यात आला.संघटनेसाठी उत्तम काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी निमारत्न हा मानाचा पुरस्कार दिला जातो. तो यावर्षी डॉ. धनंजय कुलकर्णी यांना देण्यात आला. 

.
याशिवाय निमतर्फे दिला जाणारा निमा सुपरस्टार हा पुरस्कार डॉ. अमोल माळगे व डॉ.अश्विनी देगांवकर, यांना तर निमा शायनिंग स्टार पुरस्कार डॉ. सचिन बोंगरगे डॉ.वैजनाथ स्वामी यांना तसेच निमा रायझिंग स्टार पुरस्कार -डॉ. सुनील खट्टे आणि डॉ.आदिल मुल्ला यांना देऊन प्रोत्साहित काण्यात आले. बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट अवॉर्ड डॉ.गंगाजल कलाल आणि डॉ. साक्षी अब्बड यांना देण्यात आला.

     यावर्षी निमा संघटनेला विशेष सहकार्य केल्याबद्दल निमा विशेष गौरव पुरसकार डॉ.राजलक्ष्मी गायकवाड ,डॉ. मंजिरी कुलकर्णी आणि डॉ. विलास सरवदे यांना प्रदान करण्यात आला. स्वर्गीय डॉ.अनिल पत्की स्मृती विशेष पुरस्कार डॉ. माधव गुंडेटी यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

  या कार्यक्रमाला निमा संघटनेचे पदाधिकारी डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. साहेबराव गायकवाड ,डॉ.राजश्री मठ, डॉ. सुभाष भांगे, डॉ.योगेश उडगीकर, डॉ. समर्थ वाले, डॉ. श्रुती मराठे ,डॉ.पल्लवी भांगे डॉ. उत्कर्ष वैद्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण ननवरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. पल्लवी भांगे यांनी केले .
Previous Post

मुंबई -बंगळूर सुपरफास्ट स्लीपर वंदे भारत ट्रेन व्हाया सोलापूर की मिरज ?.. संभ्रम..!

Next Post

सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवरसूर्य ओकतोय आग

Next Post
सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवरसूर्य ओकतोय आग

सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवरसूर्य ओकतोय आग

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In