सोमवार – समाजातील पुरुषांच्या बद्दल असलेली गृहीतके म्हणजे स्टिरियोटाईप्स (साचेबंद कल्पना ) यांचा पुरुषांना त्रास होत आहे, त्यामुळे पुरुषांची घुसमट वाढत आहे.”मर्द को दर्द नहीं होता”, बाईलवेडा , जोरु का गुलाम,वगैरे संकल्पना जनमानसात आहेत आणि म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे. पुरुषांनी या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे जे फायदे आहेत क ते हळूहळू सोडायला हवे म्हणजे पुरुषसत्ताक पद्धतीचे तोटेही कमी होतील. आणि महिलांना सामाजिक, कौटुंबिक जीवनामध्ये समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे .स्त्रियांचे शत्रू पुरुष नाहीत तर स्त्री-पुरुष विषमता मानणारी मानसिकता ही शत्रू आहे, आणि त्यामुळे ही मानसिकता स्त्री पुरुष दोघांनीही बदलली पाहिजे .काही विकृत पुरुषांमुळे समस्त पुरुष जातीला लागलेला धब्बा, कलंक पुसण्यासाठी आता समाजातील वैचारिक व जबाबदार पुरुषांनीच अशा विकृत पुरुषांचे प्रबोधन करण्यासाठी लढा दिला पाहिजे,पुढे आले, पाहिजे तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल आणि हे करत असताना प्रसंगी त्रास होईल परंतु सध्या आपण बदलाच्या संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास नक्कीच यश येईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे,प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड, समाजकार्य विभागाच्या डॉ.विजया महाजन आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना डॉ.विजया महाजन म्हणाल्या की, सोलापुरातील लोकप्रिय दैनिकाने पुरुष हा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला असून यावर समाजातील बुद्धिजीवी,समीक्षक,प्राध्यापक,संशोधक अशांचे आकलन, जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. स्त्री – पुरुष समानता ही काळाची गरज असून हे एक अनुकरणीय सामाजिक मूल्य आहे. हा विचार रूजवण्या करीता जागर करणे म्हणजे समाजात दुभंगलेली समानता प्रस्थापित करणे होय.
चर्चासत्रातील दुसरी अतिथी साहित्यकार समीर गायकवाड यांनी पुरुषांच्या मनामधील “आईला” साद घातली तर कौटुंबिक स्तरावरचे प्रश्न उद्भवतच नाहीत असे प्रतिपादन केले. तळागाळातल्या पुरुषांची व्यथा यांची अजूनही अभिव्यक्ती झालेली नाही असे सांगितले.
या परिसंवादात डॉ.महावीर साबळे, डॉ.अर्चना इंजल,डॉ.दत्तात्रय कांबळे,डॉ.अंजना सोनवणे आदींनी समीक्षणात्मक मनोगत सादर केले ज्यामध्ये विविध आयामातून “पुरुष” समजून घेतला गेला.
डॉ महावीर साबळे यांनी पुरुष या विशेषांकावर आपली समीक्षा नोंदविताना म्हणाले की, यात पुरुषाच्या व्यथा,कथा आणि भावविश्व उलगडले आहे.मर्द को दर्द नहीं होता! हे विधान समाजातील विसंगती दर्शवते कारण प्रत्येक पुरुष हा दर्दी असतोच पण तो व्यक्त होत नाही.
डॉ.अर्चना इंजल म्हणाले की, सृष्टीवरील पशू पक्षी हे निसर्गाच्या नियमा विरुद्ध जात नाहीत.निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण तसेच संतुलन करण्यासाठी प्रजनन करताना निसर्गाचा समतोल साधतात. हे त्यांच्यातील प्रगतशील मानवा पुढचे कार्याचे आकलन समजून घेणे यातच लैंगिक आणि स्त्री पुरुष समानता दडलेले आहे.
डॉ.दत्तात्रय कांबळे म्हणाले की, आपल्याकडे अशी प्रथा रूढ झाली की, घरात लक्ष्मीच्या पाउलांने लक्ष्मी येते तर नारायणाच्या नाकर्तेपणाुळे कडकी येते.
अर्थातच पुरुष हा नेहमी कमावताच असला पाहिजे आणि स्त्री नेहमी चूल आणि मूल केली पाहिजे ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
डॉ.अंजना सोनवणे म्हणाले की, स्त्री म्हणजे प्रजननाचे यंत्र नाही. मातृत्व ही स्त्रीला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे.आज समाजात महिलांच्या खोट्या आरोपाखाली कित्येक निरपराध पुरुषांना कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, छेडछाड अशा कित्येक गुन्ह्यात तुरुंगवास भोगत आहेत.अशा पुरुषांना कोण समजून घेणार? पत्नीच्या जाचाला कंटाळून पत्नी पीडित संघटना अस्तित्वात येत आहेत.यांच्या भावना कोण समजून घेणार असे मार्मिक प्रश्न मांडले. समानता ही कधीच एकतर्फी नसते.असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपाली पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.पद्मावती पाटील यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षा नियंत्रक डॉ.एस पी गायकवाड, प्रा.डॉ.महावीर शास्त्री, समाजकार्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा वाघमारे डॉ. ओवाळ तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, पी.एचडी करणारे विद्यार्थी, विधीज्ञ तसेच अभ्यासक, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.