राज्याच्या महिला बाल कल्याण विकास मंत्री आदिती ताई तटकरे, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकाऱ्यांसह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांनी
आदिती ताईंना पुष्पगुच्छ आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व अदितीताई तटकरे यांचा नुकताच लोकप्रिय झालेला फोटो प्रोट्रेट सप्रेम भेट दिला.
शहर – जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्व लाभार्थ्यांना रक्षा बंधनाची ओवाळणी मिळाली आहे अजून असंख्य महीला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित असून त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता आता या योजनेस भाऊबीज पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे केली .
सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाचे आदिती ताई तटकरे यांनी विशेष कौतुक केले.यावेळी जिल्हा समन्वयक आ.यशवंत तात्या माने, जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,माजी नगरसेवक नारायण माशाळकर,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख ,युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, शहर उपाध्यक्ष
ओंकार हजारे,युवती अध्यक्ष किरण माशाळकर,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख,युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, सनी देवकते, चेतन गायकवाड ,युवक संघटक दत्तात्रय बडगंची,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख डॉकटर सेल कार्याध्यक्ष महेश वसगडेकर राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे, महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार सुरेखा घाडगे श्यामराव गांगर्डे किरण शिंदे मोईज मुल्ला प्रज्ञासागर गायकवाड समीर मणियार सचिन खंडागळे यलप्पा घोडके यांच्या सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…